Dr. Homi Jehangir Bhabha Information 


भारताच्या आण्विक शक्तीचे जनक' असे ज्यांना म्हटले जाते त्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन.
अणुशक्तीचा वापर शांततेसाठी व मानवी कल्याणासाठी करावा, असे डॉ. भाभांचे मत होते. म्हणूनच भारतात अणुभट्टी उभारून बीजनिर्मिती, आरोग्यासाठी अणु, अन्न समृद्धीसाठी अणु अशी मानवी कल्याणाची मुहूर्तमेढ डॉ. भाभांनी रोवली.
 
Dr. Homi J. Bhabha


 Dr. Homi Bhabha 

होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील डॉ. जहांगीर भाभा सुप्रसिद्ध उद्योगपती टाटा यांचे मुख्य कारभारी होते. याशिवाय त्यांचे वडील बरिस्टरही होते. उपजतच असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. भाभांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. 

वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत अभ्यासला होता. त्यांचे उच्च शिक्षण एलफिन्स्टन कॉलेज व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन संस्थेत झाले. सन १९३४ झाली वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. झाले. १९३६ झाली त्यांच्या प्रबंधास एडम्स पारितोषिक मिळाले.

'अंतरिक्ष किरण' (कॉस्मिक रेज) हा त्या वेळचा कुतूहलाचा विषय डॉ. भाभांनी संशोधनासाठी निवडला. डॉ. भाभा व दुसरे शास्त्रज्ञ हायटलर यांनी अंतरिक्ष किरणावर संयुक्तपणे संशोधन करून सिद्धांत मांडला. 'अंतरिक्ष किरण कोणत्याही वस्तुरूप माध्यमातून जात असताना इलेक्ट्रॉनचा वर्षाव निर्माण करतात. याचवेळी डॉ. भाभांच्या सुदैवाने अणुशक्तीचे जनक मानले गेलेल्या प्रा. रुदरफोर्ड व डॉ. नील्स भोर या शास्त्रज्ञांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. त्यांनी अणूचे अंतरंग व 'मेसॉन मूलकणाविषयी ' संशोधन करून जागतिक अणुशास्त्रज्ञ म्हणून किर्ती मिळवली. 

 Full form of BARC ? BARC बद्दल थोडक्यात माहिती  

वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी इंग्लंडच्या रॉयल सोसायटीने त्यांना फेलो हा सन्मान बहाल केला. त्यानंतर भारतात परतल्यावर डॉ. भाभा बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या डॉ. रामन यांच्या नेतृत्वाखालील संस्थेत भौतिकशास्त्राचे अध्यापक म्हणून काम करू लागले. 

१९४० मध्ये याच ठिकाणी डॉक्टर भाभांनी अंतरिक्ष किरणांच्या अभ्यासाचे केंद्र स्थापन केले. अल्पावधीतच या केंद्राने इतकी किर्ती मिळवली की, या केंद्रांमध्ये प्रसिद्ध अमेरिकन शास्त्रज्ञ बर्नार्ड पीटर्स अमेरिकन शास्त्रज्ञ बर्नार्ड पीटर्स संशोधनासाठी आले.

देशात अणुविज्ञानाचे संशोधन करणारी एखादी मोठी संस्था असावी, करणारी एखादी मोठी संस्था असावी, असे डॉ. भाभांना वाटत होते. उद्योगपती टाटांच्या मदतीने १९४५ साली मुंबईमध्ये मूलभूत संशोधन संस्थेची स्थापना केली. तिचे पहिले संचालक म्हणून डॉ. भाभांची निवड झाली. अनेक भारतीय शास्त्रज्ञ येथे अणु विज्ञानावर संशोधन करू लागले. 

 BARC Bhabha Atomic Centre 

देश स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने भारत सरकारने अणू ऊर्जा आयोगाची स्थापना केली. या संस्थेचेही ते संचालक होते. या संस्थेत त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली.

१९५१ साली इंडियन सायन्स काँग्रेसच्या बेंगलोर अधिवेशनाचे डॉ. भाभांना अध्यक्ष करून त्यांचा गौरव केला गेला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू व डॉक्टर भाभांची मैत्री होती. 

भावी काळात अणुशक्तीची व त्या माध्यमातून निर्माण होऊ शकणाऱ्या विद्युत शक्तीची मोठ्या प्रमाणावर गरज निर्माण होणार आहे, हे ओळखून १९५४ साली पंडित नेहरूंच्या सरकारने अणुशक्ती मंडळ स्थापन केले. त्यावेळी या खात्याचे पहिले सचिव म्हणून डॉ. होमी भाभा यांचीच निवड करण्यात आली. 

या अणुऊर्जा विकास संशोधन खात्याने मुंबईत तुर्भे येथे देशातील पहिले अणू विषयक संशोधन करणारं केंद्र डॉ. भाभा यांच्याच नेतृत्वाखाली उभे केले. शेकडो संशोधक व शास्त्रज्ञ येथे गेले. शेकडो संशोधक व शास्त्रज्ञ येथे संशोधन करू लागले. 

 Bhabha online Recruitment & Result 2022 

१९५५ साली शांततेसाठी अणुशक्ती' या विषयावरील जिनिव्हा येथील जागतिक परिषदेचे डॉ. भाभांना अध्यक्षपद देऊन गौरविण्यात आले. या परिसंवादात त्यांनी अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्ब तयार करण्यासाठी न करण्याचे आव्हान सर्व देशांना केले होते.



अणुशक्तीपासून विद्युत निर्मिती म्हणजे अणुचा शांततेसाठी होणारा विधायक उपयोग. तथापि, त्यासाठी पायाभूत स्वरूपाची संशोधन यंत्रणा असावी लागते. त्यासाठी १९५५ साली भारतातील पहिली अणुभट्टी बांधण्याचा निर्णय डॉ. भाभांनी घेतला व ४ ऑगस्ट १९५६ रोजी देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील पहिली अणुभट्टी सुरू झाली. भारतीय शास्त्रज्ञ व तंत्रज्ञ यांनी ही अणुभट्टी बांधली होती. येथे अणुशक्ती वर मूलभूत संशोधन करणे भारतीयांना शक्य झाले. या अणुभट्टीत वैद्यक, कृषी, उद्योगधंदे इ. क्षेत्रात लागणारे १९८ प्रकारचे आयसोटोप्स ( समस्थानिके) तयार होऊ लागले. 

अप्सरेच्या निर्मितीनंतर कॅनडाच्या सहकार्याने १० जुलै १९६० रोजी सायरस ही दुसरी अणुभट्टी उभी केली. त्यानंतर १४ जानेवारी १९६१ रोजी झर्लीना ही तिसरी अणुभट्टी सुरू झाली. या भट्ट्यातून अणुविद्युत निर्माण करणारे अणुइंधन तयार होते. यामुळेच भारताला १९६८ साली तारापूर येथे मोठे अणुविद्युत केंद्र उभारता आले. 

 BARC official website : 

भारत सरकारचे ते वैज्ञानिक सल्लागार होते. त्यासाठी ते मानधन एक रुपया घेत. अनेक भारतीय व परदेशी विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय पदव्या बहाल केल्या होत्या. भारत सरकारकडून त्यांना १९६१ साली पद्मभूषण किताब देण्यात आला. त्याच साली त्यांना 'मेघनाथ साहा' सुवर्ण पदक देण्यात आले. 'अंतरिक्ष किरण' व कांटम सिद्धांत' हे त्यांचे प्रमुख प्रबंध होता. 

२४ जानेवारी १९६६ रोजी युरोपच्या प्रवासावर असताना स्वित्झर्लंडमधल्या आल्प्स पर्वतात, विमानच्या भीषण अपघातात या महान शास्त्रज्ञाचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर तुर्भे येथील अणू संशोधन केंद्राचे नाव बदलून भाभा अणुसंशोधन केंद्र असे करण्यात आले. 

आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना अभिवादन !