पोस्ट्स

व्यक्तिमत्त्वे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

इमेज
त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठी साहित्य क्षेत्राला व्यापक इतिहास आहे. अनेक मराठी साहित्यीकांनी या क्षेत्रात दिलेले योगदान आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जुन्या काळातील काही साहित्यीकांची साहित्य संपदा आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अशा अजोड साहित्यीकांमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक आहेत  त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. गत काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहेत.   Balkavi ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. वडीलांच्या निधनानंतर बालक...

Dr Homi Jehangir Bhabha Information

इमेज
 Dr. Homi Jehangir Bhabha Information  भारताच्या आण्विक शक्तीचे जनक' असे ज्यांना म्हटले जाते त्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन. अणुशक्तीचा वापर शांततेसाठी व मानवी कल्याणासाठी करावा, असे डॉ. भाभांचे मत होते. म्हणूनच भारतात अणुभट्टी उभारून बीजनिर्मिती, आरोग्यासाठी अणु, अन्न समृद्धीसाठी अणु अशी मानवी कल्याणाची मुहूर्तमेढ डॉ. भाभांनी रोवली.   Dr. Homi J. Bhabha  Dr. Homi Bhabha  होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील डॉ. जहांगीर भाभा सुप्रसिद्ध उद्योगपती टाटा यांचे मुख्य कारभारी होते. याशिवाय त्यांचे वडील बरिस्टरही होते. उपजतच असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. भाभांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती.  वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत अभ्यासला होता. त्यांचे उच्च शिक्षण एलफिन्स्टन कॉलेज व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन संस्थेत झाले. सन १९३४ झाली वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. झाले. १९३६ झाली त्यांच्या प्रबंधास एडम्स पारितोषिक मिळाले. 'अंतरिक्...

about Sardar Vallabhbhai Patel in marathi

इमेज
 Sardar Vallabhbhai Patel information in Marathi  सरदार वल्लभभाई पटेल यांची 31 ऑक्टोबर रोजी जयंती आहे. भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यत्तोर काळात सरदार पटेल यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे. देशाच्या एकीकरणासाठी आणि अखंडत्वासाठी वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या महापुरूषाने केलेल्या कार्याचे स्मरण आवश्यक आहे.   National Unity Day सरदार पटेल ( Sardar Vallabhbhai Patel )  हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान म्हणून त्यांनी शेकडो राज्ये भारतीय संघात विलीन केली. भारताचे राजकीय एकीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. सरदार पटेल हे लोहपुरुष म्हणूनही लोकप्रिय आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.   Sardar Vallabhbhai Patel  वल्लभभाई पटेल यांचा जन्म गुजरातमधील नाडियाड या छोट्याशा गावात 31 ऑक्टोबर 1875 रोजी झाला. त्यांचे वडील शेतकरी होते आणि आई एक सामान्य महिला होती. शालेय जीवनात ते एक हुशार विद्यार्थी होते. शिक्षणानंतर त्यांनी वकीली सुरू केली. सरदार पटेल यांनी आपला यशस्वी वकिली व्यवसा...

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | Rashtrasant Tukdoji Maharaj

इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 👉 जन्म : यावली शहीद या गावी अमरावती जिल्ह्यात 30 एप्रिल 1909 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य लढ्यात (भारत छोडो आंदोलनात) तसेच राष्ट्रकार्यात आणि सामाजिक कार्यात (जसे आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत) सक्रिय सहभागी झाले.  भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची विचारसरणी होते. यासाठी महाराजांनी खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 👉  सन 1935 मध्ये मोझरी येथे "गुरुकुंझ" आश्रमाची स्थापना केली. 👉  'खंजिरी भजन' हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य. 👉 आत्मसंयमनाचे विचार त्यांनी "ग्रामगीता" या काव्यसंग्रहातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. 👉 शेवटी महत्त्वाचे, तुकडोजी महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिक एवढी प्रभावशाली होती की, त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी "राष्ट्रसंत" या उपाधीने सन्मानित केले. 👉 र...

कवी मंगेश पाडगावकर | poetry Mangesh Padgaonkar

इमेज
कवी मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ )   poetry Mangesh Padgaonkar जन्म - १० मार्च १९२९ (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) स्मृती - ३० डिसेंबर २०१५ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.      शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले.      कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं.      स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेम कवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. सहज सोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या.       मंगेश पाड...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती | बालिका दिन | 03 जानेवारी

इमेज
क्रांतीज्योती माऊली सावित्रीबाई फुले जन्म - ३ जानेवारी १८३१ (नायगाव) स्मृती - १० मार्च १८९७ (पुणे) मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. KrantijyotiS avitribai Phule सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.  फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली (यापूर्वी मिशनर्या्नी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या). या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या...