थांबा : दिवाळी फराळ खाता तर आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम / Diwali Sweet and Health
थांबा : दिवाळी फराळ खाता तर वाचा आरोग्यावर होऊ शकतो विपरीत परिणाम आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण-उत्सवादी योजना आपल्या चतुर पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक सणांचा राजा म्हणावा असा सण म्हणजे दिवाळी! दिवाळीच्या सणाचा इतिहास पुराणकाळाच्याही मागे जाऊन पोहोचतो. उपनिषद काळामधील गृहसंस्कारातल्या पार्वण, आश्वयुजी व आग्रयण या पाकयज्ञांचे एकीकरण आणि रूपांतर होऊन आपण ज्याला दीपावली म्हणतो, तो सण अस्तित्वात आला असावा, असे प्रसिद्ध वेदाभ्यासक ऋग्वेदी म्हणतात. या पाकयज्ञांमध्ये नवीन धान्याची खीर, नवीन भातांचे पोहे वा पोह्यांचा गोड पदार्थ अशी मिष्टान्ने बनवली जात. सुप्रसिद्ध जगप्रवासी आल्बेरुनीच्या ११ व्या शतकातील भारतदर्शनामध्ये दिवाळीमधील उत्सवाचे वर्णन आहे, जे आपल्या दिवाळ फराळाची निदान १००० वर्षांची परंपरा सिद्ध करते. प्रत्यक्षात आज आपण जो फराळ बनवतो, त्या फराळामधील विविध खाद्यपदार्थाचे उल्लेख ज्या क्षेमकुत्तूहल, कुतूहल आदी पाकशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये सापडतात, ते साधारण ११ व्या शतकामधले रचलेले ग्रंथ आहेत. या प्राचीन ग्रंथांमध्...