ट्रेकिंगचा अर्थ? Trekking Meaning ?

ट्रेकिंगला का जावे? Why does Trekking?

ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली देत आहे. त्याआधी trekking चा meaning काय आहे? ते पाहू. ट्रेकिंगचा अर्थ " खूप दूरवरचा खडतर प्रवास, तो सुद्धा पायी. " या खडतर प्रवासात डोंगरदऱ्या, पर्वतरांगा, गड यांचा समावेश होतो.

Trekking मूळे शरीराच्या अनेक अवयवांवर आणि स्नायूंवर ताण पडतो, ज्यामुळे रक्ताभिसाराणाची गती वाढली जाते त्यामुळे मन उत्साही आणि प्रसन्न बनते.

trekking-near-pune-mumbai
trekking-hiking-pune-mumbai

दुर्ग सर करणाऱ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत. आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील, असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा. चला मग पाहू, ट्रेकिंग करण्याने वा गड चढण्याने कोणकोणते फायदे होतात. 👇👇👇

श्वसन - 

गडावर वा डोंगरावर, खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते.

रक्तप्रवाह - 

श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरणाची क्रिया जलद होते. शिरांतील, नसांतील ब्लॉकेज निघतात. 

छाती - 

Trekking करताना दम भरला जातो. दम भरल्याने फुफ्फुसे पुर्ण क्षमतेएवढी हवा आत घेतात आणि बाहेर सोडतात. त्यामुळे फुफ्फुसांचा ही चांगला व्यायाम होतो. तसेच गड वा डोंगरावर मोठ्या प्रमाणात झाडांचा आश्रय असतो, तेथे आपल्याला ऑक्सिजन (O2) मुबलक मिळतो. यामूळे रक्तशुद्धीस मदत होते.

पोट - 

गुरुत्वाकर्षणाच्या विरुध्द चालताना डीहाइड्रेशन मुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते, पण गडावर गेल्यावर झरा, तळी, पावसाचे अतिशुद्ध पाणी पिल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढते,

दैनंदिन दुषित पाण्यामुळे होणारे पोटाचे विकार दुर व्हायला हातभार लागतो. शरीरावरील चरबी कमी होते.

याबरोबर trekking मूळे गुडघे आणि पायांवरही ताण पडतो, यामूळे सर्व स्नायु उत्तेजित आणि मोकळे होतात.

मानसिक आजार - 

रोजच्या धकधकीच्या जीवनातील ताण-तणाव हे गडावरील मनाला प्रसन्न करणारे वातावरण, निसर्गाचे मुक्तहस्त चित्रण, निसर्गाचे रंग-रुप पाहुन दुर होतात.

गडावरील सौंदर्य पाहुन भारलेले मन घेऊनच आपण खाली येतो. मनाची प्रसन्नता वाढते आणि ताण-तणाव निवळायला मदत होते. या आठवणी अनेक दिवस, अनेक महिने, अनेक वर्ष आपल्याबरोबर राहतात, त्यामुळे नुसत्या आठवणीनेही आपले मन प्रसन्न होते.

किमान, महिन्यातून एकदातरी आपल्या जवळचे डोंगर, टेकड्या सकाळी सकाळी ट्रेकिंग करा आणि सर्व आजारांवर मात करा. आपल्या फिटनेससाठी निसर्गाच्या सानिध्यात विनामूल्य मिळणारे हे फार मोठे औषध आहे.

शेवटी एवढेच म्हणेन, "महिन्यातुन एक गड-किल्ले-दुर्गवारी करा, रोग आणि आजारांतुन बाहेर पडा."


हे ही नक्की वाचा :