Information about the Solar eclipse in marathi 

 खंडग्रास सूर्यग्रहणाची माहिती 

मंगळवारी २५ ऑक्टोबर २०२२ रोजी खंडग्रास सूर्यग्रहण आहे. या दिवशी अश्विन कृष्ण दर्श अमावास्या आहे. या पार्श्वभूमीवर खंडग्रास सूर्यग्रहण आणि त्या संबंधीची माहिती जाणून घेतली पाहिजे.

facts about the solar eclipse in marathi
facts about solar eclipse


about Solar Eclipse 2022 in marathi

मुंबई येथील ग्रहण स्थितीची माहिती अशी 
  • ग्रहण स्पर्श दुपारी ४ वा. ४९ मी, 
  • ग्रहण मध्य - दुपारी ५ वा. ४३ मी, 
  • सूर्यास्त - सायंकाळी ६ वा. ८ मी. 
  • पर्व- १ तास १९ मी.

 ग्रहण दिसणारे प्रदेश - 

हे सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून खंडग्रास ग्रस्तास्त स्वरुपात दृश्यमान होणार आहे. स्विडन, फिनलॅन्ड, रशिया, जॉर्जिया, पूर्व युरोप, कझाकिस्तान, इराक, इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तान, उत्तरपूर्व आफ्रिका.

 पुण्यकाल - 

हे सूर्यग्रहण सर्वत्र ग्रस्तास्त दिसणार आहे. म्हणजे ग्रस्त असलेले सूर्यबिंब अस्तास जाईल. त्यामुळे भारतात कोठेही ग्रहण मोक्ष दिसणार नाही. म्हणून आपल्या गावाच्या सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पुण्यकाल मानावा लागेल.

 ग्रहणाचा वेध - 

मंगळवारी पहाटे ३ वा. ३० मी. वेध चालू होणार आहे. 
सायंकाळी ६ वा. ३२ मी. पर्यंत तो वेध आहे.

 गरोदर स्त्रियांनी वेध पाळणे  - 

गरोदर स्त्रियांनी कटाक्षाने या पध्द्तीने वेध पाळावेत
Solar Eclipse 2022 for pregnant ladies :

solar-eclipse-2022-for-pregnant-ladies
solar-eclipse-2022-for-pregnant-ladies

  • मंगळवारी दुपारी १२ वा. ३० मी. वेध पाळणेस सुरुवात करावी. 
  • सायंकाळी ६ वा. ३२ मी. सूर्यग्रहण संपते. सायंकाळी ६ वा. ३२ मी. नंतर गरोदर स्त्रियांनी आंघोळ करुन तुळशीची पाने घालून चहा, दूध, पाणी पिणे. भोजन करु नये. 
  • बुधवार २६ ऑक्टोबर २०२२ रोजी सूर्योदयानंतर आंघोळ करुन किंवा सूर्योदय झाल्यावर श्रीसूर्य दर्शन घेऊन भगवान श्रीसूर्यनारायणाला नमस्कार करुन अन्नप्राशन किंवा भोजन करावे.

 मोक्षस्थान व भोजनाविषयी - 

या ग्रहणाचा मोक्ष दिसणार नसल्याने मोक्षाची वेळ दिलेली नाही. 
भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६ वा. ३२ मी. नंतर गरोदर स्त्रियांनी आंघोळ करणे नंतर दुसरे दिवशी बुधवारी सकाळी सूर्यबिंब पाहून भगवान श्रीसूर्यनारायणाला नमस्कार करुन अन्नप्राशन किंवा भोजन करावे. 

about Solar Eclipse

हे ग्रहण तुळ राशीत स्वाती नक्षत्रावर होत आहे. कन्या, तुळ व वृश्चिक राशीच्या व्यक्तींना तसेच चित्रा, स्वाती व विशाखा ही जन्मराशी असलेल्या व्यक्तींना त्रासदायक आहे. अश्विन महिन्यात होणारे हे सूर्यग्रहण जनतेला त्रासाचे आहे. चीन व मुस्लिम राष्ट्रे इत्यादी भागामधील सर्व जनतेला खूप त्रासाचे आहे. तसेच शल्यचिकित्सक, वैद्य यांनाही त्रासाचे आहे.

  • दुपारी ४ वा. ४९ मी. ते सायंकाळी ६ वा. ३२ मी. पर्यंत पाणी पिणे, झोपणे कटाक्षाने पाळावे. 
  • शक्यतो नर्मदा नदीमध्ये स्नान करावे. नर्मदा माता श्रेष्ठ आहे. 
  • नर्मदा नदीत आंघोळ करणे जमत नसेल तर आपल्या घरी आंघोळ करताना “ॐ नर्मदा देवी माताय नमः" हा मंत्र म्हणावा. 
  • कोठेही वाहत्या पाण्यात जाऊन आंघोळ करा. आंघोळ करताना नर्मदा नदीचे नाव घ्यावे म्हणजे आपण पवित्र शुद्ध व्हाल.