चलनी नोटांवर गांधीजींचे छायाचित्रच का ? 

 चलनी नोटांवरील ( Currency notes ) छायाचित्रांबाबत सध्या चर्चेत असलेला वाद 




चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या छायाचित्रांबरोबरच लक्ष्मी आणि गणपती या देवतांची चित्रे छापावीत, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. सध्या हा एक मोठा चर्चाविषय झाला आहे. यानिमित्ताने नोटांवरील चित्रांविषयी...


 नोटांवरील चित्रांचा इतिहास 

 Old Indian currency notes 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ब्रिटिश राजवटीत, 1935 साली झाली. यानंतर तीन वर्षांनी, 1938 साली देशातील पहिली चलनी नोट छापण्यात आली. एक रुपयाच्या त्या नोटेवर ब्रिटनचे राजे सहावे जॉर्ज यांचे छायाचित्र होते. 

 indian currency before gandhi 

स्वतंत्र भारतातील पहिली चलनी नोट 12 ऑगस्ट 1946 रोजी छापण्यात आली. त्या नोटेवर अशोकस्तंभाचे छायाचित्र होते. 1954 मध्ये देशात एक हजार, पाच हजार आणि दहा हजार रुपयाच्या नोटा छापण्यात आल्या. त्यावर अनुक्रमे तंजावूरचे मंदिर, गेटवे ऑफ इंडिया, अशोकस्तंभ यांचे छायाचित्र होते. 

1978 मध्ये देशात पहिली नोटबंदी झाली. त्यावेळी या नोटा बाद करण्यात आल्या. दोन आणि पाच रुपयांच्या नोटांवर सिंह, हरीण अशा प्राण्यांची छायाचित्रे होती. 2 रुपयाच्या नोटेवर थोर गणिती आर्यभट्ट यांचे चित्र होते. तर 10 रुपयांच्या नोटेवर मोराचा, तर 20 रुपयांच्या नोटेवर सूर्यमंदिरातील रथाच्या चाकाचे चित्र होते.


 गांधीजींचे छायाचित्र नोटेवर कधी आले ? 


महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने 1966 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर त्यांचे छायाचित्र छापण्यात आले. 100 रुपयांच्या त्या नोटेवरील चित्रात म. गांधी खाली बसलेले असून पाठीमागे सेवाग्राम आश्रम दिसतो. 
नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर 2000 रुपयांची नवीन नोट चलनात आली. त्यावरही महात्मा गांधींचेच चित्र ठेवण्यात आले आहे.

सध्या चलनात असलेल्या नोटांची थोडक्यात माहिती खाली दिली आहे, नक्की वाचा. 

 नोटांवरील चित्रांविषयीचा निर्णय कोण घेते ? 


'चलनी नोटा वा नाणी यांच्या डिझाईनबाबतचा निर्णय रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकार हे मिळून घेतात. रिझर्व्ह बँक आधी चलनाचे डिझाईन तयार करून घेते. हे काम करण्यासाठी बँकेत खास विभाग असतो. त्यास डिपाटमेंट ऑफ करन्सी मॅनेजमेंट म्हणतात. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हे त्याचे प्रमुख असतात. या विभागाने तयार केलेले चलनी नोटांचे डिझाईन बँकेच्या केंद्रीय मंडळाने स्वीकृत केल्यानंतर केंद्र सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवले जाते.


10 रुपयापासून ते 2000 च्या नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याव्यतिरिक्त आणखी एक चित्र रिझर्व्ह बँकेकडून छापले जात आहे. प्रत्येक नोटांच्या समोरच्या भागाला महात्मा गांधी यांचा फोटो दिसून येतो. मात्र प्रत्येक नोटांच्या मागच्या बाजूला वेगवेगळे चित्र छापले जातात.

नोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी झाल्यानंतर 10, 20, 50, 100, 200, 500 व 2000 रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. त्यावरही महात्मा गांधींच्या  चित्राबरोबर प्रत्येक नोटांच्या मागच्या बाजूला वेगवेगळे चित्र छापण्यात आले आहे. त्या नोटांची थोडक्यात माहिती जाणून घेऊ 👇👇


 १० रुपये ( new 10 rupees notes ) सूर्यमंदिर 

दहा रुपयाच्या नोटेवर मागच्या बाजूला ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील सूर्यमंदिराचा (कोणार्क) फोटो बघायला मिळतो. १३ व्या शतकातील गंगवंशाचे राजा नरसिंग देव प्रथम यांनी हे मंदिर बांधले असे म्हटले जाते. 



१९८४ मध्ये या मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसाच्या यादीत समाविष्ट केले होते. येथे दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात चंदभाग जत्रा आयोजित केली जाते.


 २० रुपये new 20 rupees notes ) एलोराच्या लेण्या 

20 रुपयाच्या नोटे च्या मागच्या बाजूला औरंगाबाद जिल्ह्यातील एलोराच्या लेण्यांचे चित्र छापले असल्याचे आपल्यास बघावयास मिळते. राष्ट्रकुश वंशाच्या काळात एलोरास्थित हिंदू आणि बौद्ध लेण्यांचे निर्माण केले गेले. तर यादव वंशाच्या काळात येथेच जैन लेण्यांचे निर्माण झाले.
 


युनेस्कोच्या जागतिक वारसाच्या यादीत यास स्थान देण्यात आले आहे.

 ५० रुपये new 50 rupees notes ) हम्पी येथील रथ 

50 रुपयाच्या नोटवर हम्पी येथे दगडापासून तयार केलेल्या रथाचे चित्र बघायला मिळते. कर्नाटकच्या विठ्ठल मंदिर परिसरात दगडावर विशाल रथ कोरण्यात आला आहे. हा रथ गरुडाला समर्पित आहे. १९८६ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले.

 १०० रुपये new 100 rupees notes ) राणीची विहीर 

अकराव्या शतकात बनवण्यात आलेली राणीची वाव सुद्धा युनेस्कोच्या यादीत सामील आहे. गुजरातच्या पाटण गावात सरस्वती नदीकाठी बांधण्यात आलेली
 


ही विहीर सोलंकी साम्राज्याच्या काळातील आहे. विहिरीतून भगवान विष्णूशी संबंधित अनेक कलाकृती काढण्यात आल्या आहेत. नक्षीदार खांब आणि भिंतीवर तब्बल ८०० मूर्ती कोरून काढण्यात आल्या आहेत. या सर्व भगवान विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित आहेत.

 २०० रुपये new 200 rupees notes ) सांचीतील स्तूप 

मध्यप्रदेशात बुद्ध धर्माशी संबंधित ऐतिहासिक सांची स्तूप आहे. सम्राट अशोक यांनी हे स्तूप बनवले होते. ईसापूर्व तिसऱ्या शतकात झालेल्या कलिंग युद्धानंतर अशोकने शांतीचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी हे स्तूप बनवले होते. हे स्तूपसुद्धा जागतिक वारसाच्या यादीत आहे.

 ५०० रुपये new 500 rupees notes ) लाल किल्ला 

500 च्या नोटवर दिल्लीतील लाल किल्ल्याचे चित्र बघायला मिळते. मुगल बादशाह शाहजहानच्या काळात लाल रंगाच्या विटांपासून हा किल्ला बनवला होता. भारताचे पंतप्रधान दरवर्षी २६ जानेवारीला या ठिकाणी तिरंगा फडकावतात.

 २००० रुपये new 2000 rupees notes ) मंगलयान (Mass orbitor mission ) 



भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) २०१४ मध्ये अंतराळात पाठवलेले मंगलयान मंगळावर दाखल झाले होते. या मोहिमेस इस्रोची सर्वात मोठी उपलब्धी मानली जाते. भारतापूर्वी कोणताही देश आपल्या पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला नाही.