जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो.

आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना फार महत्व आहे.त्यांचे विशेष सन्मान आणि कौतुक केले जाते.आपल्याकडे महिलेला देवीचे रूप मानले जाते.पुराणातील श्लोक मध्ये देखील स्त्रियांचा महत्वपूर्ण उल्लेख केला गेला आहे.जसे की “यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता” या ओळींचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते,त्या ठिकाणी भगवंत निवास करतात.


women's day
happy womens day


1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.
 ऑगस्ट 1910 मध्ये, डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे सोशलिस्ट सेकंड इंटरनॅशनलच्या
(International Socialist Women's) सर्वसाधारण सभेच्या आधी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकन समाजवाद्यांपासून प्रेरित होऊन, जर्मन प्रतिनिधी क्लारा झेटकिन, केट डंकर आणि इतरांनी वार्षिक ‘महिला दिन’ (women's day) स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन (women's day) साजरा केला.


womens day
womens day

आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिनाचे प्रतीक म्हणून जांभळा रंग घेतला जातो.आंतरराष्ट्रीय महिला दिन 
(8 मार्च) हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करण्याचा जागतिक दिवस आहे.
आजच्या आधुनिक काळात स्त्रियांबद्दल लोकांचे विचार हे बदलले आहेत.आजचे लोक महिलांना सगळीकडे वाव मिळवा आणि ते सर्वत्र सक्षम व्हावे या साठी प्रयत्नशील आहेत.

 ! जागतिक महिला दिनाच्या हर्दिक शुभेच्छा !

               

आता महिलांना त्यांच्या अधिकारांचा योग्य वापर कसा करायचा हे माहित आहे.आज प्रत्येक क्षेत्रात महिलांच्या कामगिरीची गणना करता येईल. विविध क्षेत्रात महिलांनी केलेली प्रगती हे अजून वाढावी आणि महिला अजून सक्षम व्हाव्या या प्रबळ भावनेने जगभरात जागतिक महिला दिन साजरा केला जातो.स्त्रियांनी कुठेही कमी पडू नाही अशी सर्वांची भावना आहे.स्त्री ही फक्त घराची नाही तर आपल्या देशाचा अभिमान आहे.आजच्या महिला पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत.