कल्पना चावला यांची जीवनपरिचय  


कल्पना चावला ही हरियानाची एक अवकाश - विरंगणा होती. कल्पना म्हणजे स्त्री शक्तीचा एक अविष्कारास असे म्हणावे लागेल. कल्पना चावला पहिली भारतीय महिला, की जिने अंतराळ झेप घेतले आणि एवढंच नाही; तर ती त्या अंतराळयानाची ची संचालक होती.
हरियाणातील 'करनाल' नावाच्या एका छोट्याशा खेड्यात कल्पनाचा जन्म (१७ मार्च १९६२) साली झाला. तिच्या वडिलांचे नाव बनारसीलाल तिच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव संज्योती होते. कर्नालमध्येच तिने आपले प्राथमिक शिक्षण घेतले.शाळेत तिने नृत्याबरोबर कराटेचेही शिक्षण घेतले होते. सायकलवरून वेगात फिरणे तिला फार आवडे.


kalpna chawla
kalpna chawla

लहानपणापासून तिला अवकाशाचे अतिशय वेड होते. ती तासंन्तास ग्रह - ताऱ्यांकडे नजर लावून बसत असे. ती सतत उंच उंच जाण्याचा विचार करत राहायची. आपण एखादे अवकाशयान चालवत आहोत, अशी स्वप्ने ती कायम बघायची. ही स्वप्ने सत्यात येण्यासाठी तिने लहानपणापासूनच खूप कष्ट घेतले. चंदीगडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एरोनॉटिक्स (विमान अभियांत्रिकी) हा विषय घेण्यारी ती एकमेव विद्यार्थीनी होती. इंजीनियरिंअगच्या अंतिम परीक्षेत पंजाब विद्यापीठात ती प्रथम आली होती. त्यानंतर अमेरिकेत 'एम.एस' च्या परीक्षेत प्रथम क्रमांक संपादन करून 'एरोस्पेस इंजीनियरिंग' विषयात तिने अवघ्या २७ व्या वर्षी डायरेक्टर मिळवली. कल्पना चावला जेव्हा उच्च घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या, तेव्हा त्यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. कल्पना चावला त्यांच्याकडून विमान चालवण्याचे शिक्षण घेत होत्या. त्या वेळेस त्यांचे लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाले.जेपी आणि कल्पना चावला यांच्या मैत्रीचे नाते प्रेमात बदलले आणि १९८४ साली त्यांचा विवाह झाला.
अमेरिकेत 'केनेडी स्पेस सेंटर' इथे तिने अवघ्या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि ती 'नासा' ला गेली. तिने प्रशिक्षक म्हणून काम केले. कल्पनाचे ध्येय होते की, आपल्या ज्ञानाने जगाची काही कल्याण व्हावे. 'वसधैव कुटुम्बकम' म्हणजे सगळे जग हे एक कुटुंब आहे आणि 'कर्मनवाधिकारस्ते' कर्म करण्याचा अधिकार तुला आहे. अशाप्रकारे उंच्च विचारांनी ती प्रेरित झालेली होती.
पण अचानक दैवाचा घाला कल्पनावर पडला. १६ जानेवारी २००३ रोजी कल्पना कोलंबिया यानातून आपल्या सहकाऱ्यासोबत अवकाशात झेपावली. १६ दिवसांची मोहीम पूर्ण करून यान पृथ्वीकडे निघाले. जमिनीपासून अवघ्या ६० कि. मी. उंचीवर असताना आणि नियोजीत वेळेच्या केवळ १६ मिनिटे आधी यानाचा नियंत्रण संपर्क तुटला. १ फेब्रुवारी २००३ रोजी कोलंबिया एस.टी.एस. १०७ या अवकाशयानाच्या अपघाताने तिची प्राणज्योत मालवली.
कल्पना चावला देहाने गेली; पण ती तिच्या असामान्य कर्तुत्वाने अमर झाली आहे. तिच्याकडून भारताच्या युवा पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे. ज्या देशातील तरुण - तरुणी उच्च स्वप्ने बघतात आणि ती साकारण्यासाठी जीवाची बाजी लावतात, त्या देशाचे भविष्य हे नक्कीच उज्वल असते,

कल्पना चावला यांची माहिती (kalpna chawla biography in Marathi)

पूर्ण नाव (Name)कल्पना चावला
जन्म (Born)१७ मार्च १९६२
जन्मस्थान (Birthplace)करनाल, हरियाणा, भारत
मृत्यु (Death)१ फेब्रुवारी २००३
मूळ_गावकरनाल
वडिलांचे नाव (Father)बनारसीलाल चावला
आईचे नाव (Mother)संज्योती चावला
पतीचे नावजीन पियरे टॅरिसन
अपत्ये
व्यवसाय (Occupation)इंजीनियर, टेक्नोलॉजिस्ट
भाषाहिंदी, इंग्लिश
पुरस्कार (Award)कांग्रेशनल स्पेस मेडल ऑफ ऑनर
राष्ट्रीयत्वसंयुक्त राज्य अमरीका भारत

कल्पना चावला यांना मरणोत्तर नंतर (Congressional Space Medal) देऊन सन्मानित करण्यात आले.

कल्पना चावलाला मिळालेले पुरस्कार :

  • कांग्रेशनल स्पेस पदक सन्मान
  • नासा अन्तरिक्ष उडान पदक
  • नासा विशिष्ट सेवा पदक.