पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज | Rashtrasant Tukdoji Maharaj

इमेज
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 👉 जन्म : यावली शहीद या गावी अमरावती जिल्ह्यात 30 एप्रिल 1909 रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी स्वातंत्र्य लढ्यात (भारत छोडो आंदोलनात) तसेच राष्ट्रकार्यात आणि सामाजिक कार्यात (जसे आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत) सक्रिय सहभागी झाले.  भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी त्यांची विचारसरणी होते. यासाठी महाराजांनी खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल याविषयीची जी उपाययोजना सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 👉  सन 1935 मध्ये मोझरी येथे "गुरुकुंझ" आश्रमाची स्थापना केली. 👉  'खंजिरी भजन' हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे प्रमुख वैशिष्ट्य. 👉 आत्मसंयमनाचे विचार त्यांनी "ग्रामगीता" या काव्यसंग्रहातून मांडले. मराठी व हिंदी भाषांमध्ये तुकडोजी महाराजांनी काव्यरचना केली. 👉 शेवटी महत्त्वाचे, तुकडोजी महाराजांची क्रियाशीलता आणि वैचारिक एवढी प्रभावशाली होती की, त्यावेळचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी "राष्ट्रसंत" या उपाधीने सन्मानित केले. 👉 र...

कवी मंगेश पाडगावकर | poetry Mangesh Padgaonkar

इमेज
कवी मंगेश पाडगावकर ( १० मार्च १९२९ - ३० डिसेंबर २०१५ )   poetry Mangesh Padgaonkar जन्म - १० मार्च १९२९ (वेंगुर्ला, सिंधुदुर्ग) स्मृती - ३० डिसेंबर २०१५ कवी मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला.      शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले.      कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं.      स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेम कवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. सहज सोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या.       मंगेश पाड...

Trekking Meaning | Why does Trekking | ट्रेकिंगला का जावे?

इमेज
ट्रेकिंगचा अर्थ?  Trekking Meaning ? ट्रेकिंगला का जावे? Why does Trekking? ट्रेकिंगचे अनेक फायदे आहेत. त्याची सविस्तर माहिती खाली देत आहे. त्याआधी trekking चा meaning काय आहे? ते पाहू. ट्रेकिंगचा अर्थ " खूप दूरवरचा खडतर प्रवास, तो सुद्धा पायी. " या खडतर प्रवासात डोंगरदऱ्या, पर्वतरांगा, गड यांचा समावेश होतो. Trekking मूळे शरीराच्या अनेक अवयवांवर आणि स्नायूंवर ताण पडतो, ज्यामुळे रक्ताभिसाराणाची गती वाढली जाते त्यामुळे मन उत्साही आणि प्रसन्न बनते. trekking-hiking-pune-mumbai दुर्ग सर करणाऱ्यांना श्वसन, रक्तप्रवाह, गुडघे, छाती पोट आणि मानसिक आजार होणार नाहीत. आधुनिक वैद्यकशास्त्रात याचे संदर्भ आढळत नसतील, असे समजुन याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा स्वतः एकदा खात्री करा. चला मग पाहू, ट्रेकिंग करण्याने वा गड चढण्याने कोणकोणते फायदे होतात. 👇👇👇 श्वसन -   गडावर वा डोंगरावर, खालुन वर चढताना श्वासांची प्रक्रिया जलद होते, त्यामुळे पुर्ण श्वासोच्छ्वासाची क्रिया घडते. श्वासोच्छ्वासाच्या क्रियेला चालना मिळते. रक्तप्रवाह -  श्वासोच्छ्वास जलद झाल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो, रक्ताभिसरण...

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती | बालिका दिन | 03 जानेवारी

इमेज
क्रांतीज्योती माऊली सावित्रीबाई फुले जन्म - ३ जानेवारी १८३१ (नायगाव) स्मृती - १० मार्च १८९७ (पुणे) मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. KrantijyotiS avitribai Phule सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणाऱ्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० साली जोतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.  फुले परिवार हा मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली (यापूर्वी मिशनर्या्नी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या). या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या...