पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वेळेचा आदर केला पाहिजे / Time should be respected

इमेज
वेळेचा आदर केला पाहिजे /  Time should be respected काळ कोणासाठीही थांबत नाही. तो पुढे सरकतच राहणार आहे. काळाला कोणीही थांबू शकत नाही. आपल्याकडे किती पैसा, किती ताकद, किती मान आहे याला महत्व नाही. त्यासाठी वेळेचा आदर करायला हवा. गरीब असो किंवा श्रीमंत वेळ ही सर्वांना समान सारखीच आहे.  दिवसाचे २४ तास इतका वेळ सर्वांसाठी सारखाच मिळतो. तुम्ही हे २४ तास कसे घालवता यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.  शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन रात्री १ तास डुलकी घ्यायचे. आयझेक न्युटन रात्री ३ ते ४ तास झोपायचे किंवा अनेक दिवस झोपेतच नसे. अलेक्झांडर ग्राहम बेल, दिवसभर काही काळ झोपायचे मात्र ते रात्री १० ते पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत काम करायचे.  म्हणजे जीवनात यशस्वी माणसांचा विचार केला तर ते वेळेला फार किंमत द्यायचे.  यावरून लक्षात येते. सर्वसाधारण व्यक्ती आपला वेळ कसा घालवायचा याचा विचार करत असतात, तर नेतृत्वक्षम व्यक्ती वेळ चांगल्या पद्धतीने वापरायचा यांचा विचार करत असतात.  आज जो तो इंटरनेटच्या मोहजालात अडकत चालला आहे. जिकडे तिकडे प्रत्येकाच्या हाती मोबाईलच दिसू लागले आहे. पु...

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

इमेज
त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठी साहित्य क्षेत्राला व्यापक इतिहास आहे. अनेक मराठी साहित्यीकांनी या क्षेत्रात दिलेले योगदान आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जुन्या काळातील काही साहित्यीकांची साहित्य संपदा आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अशा अजोड साहित्यीकांमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक आहेत  त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. गत काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहेत.   Balkavi ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. वडीलांच्या निधनानंतर बालक...