Dr Homi Jehangir Bhabha Information
Dr. Homi Jehangir Bhabha Information भारताच्या आण्विक शक्तीचे जनक' असे ज्यांना म्हटले जाते त्या डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा आज जन्मदिन. अणुशक्तीचा वापर शांततेसाठी व मानवी कल्याणासाठी करावा, असे डॉ. भाभांचे मत होते. म्हणूनच भारतात अणुभट्टी उभारून बीजनिर्मिती, आरोग्यासाठी अणु, अन्न समृद्धीसाठी अणु अशी मानवी कल्याणाची मुहूर्तमेढ डॉ. भाभांनी रोवली. Dr. Homi J. Bhabha Dr. Homi Bhabha होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे वडील डॉ. जहांगीर भाभा सुप्रसिद्ध उद्योगपती टाटा यांचे मुख्य कारभारी होते. याशिवाय त्यांचे वडील बरिस्टरही होते. उपजतच असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या डॉ. भाभांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी आईन्स्टाईनचा सापेक्षतावादाचा सिद्धांत अभ्यासला होता. त्यांचे उच्च शिक्षण एलफिन्स्टन कॉलेज व रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या दोन संस्थेत झाले. सन १९३४ झाली वयाच्या पंचविसाव्या वर्षी ते केंब्रिज विद्यापीठातून पीएच.डी. झाले. १९३६ झाली त्यांच्या प्रबंधास एडम्स पारितोषिक मिळाले. 'अंतरिक्...