त्र्यंबक बापूजी ठोंबरे
त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठी साहित्य क्षेत्राला व्यापक इतिहास आहे. अनेक मराठी साहित्यीकांनी या क्षेत्रात दिलेले योगदान आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जुन्या काळातील काही साहित्यीकांची साहित्य संपदा आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अशा अजोड साहित्यीकांमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक आहेत त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. गत काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहेत. Balkavi ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. वडीलांच्या निधनानंतर बालक...