पोस्ट्स

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांचे थोडक्यात हृदयस्पर्शी भाषण

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण थोडक्यात, नमस्कार, आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक, आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण सर्व इथे आपला ७६ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. २६ जानेवारी १९५० रोजी आपला संविधान अंमलात आला, आणि भारत खऱ्या अर्थाने एक लोकशाही राष्ट्र बनला. या दिवशी आपण आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाची आठवण ठेवतो, ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील घटनाकारांनी आपल्याला जगातील सर्वोत्तम संविधान दिलं. आजच्या दिवशी आपण शपथ घ्यायला हवी की आपण आपल्या देशाच्या प्रगतीसाठी, एकतेसाठी, आणि शांततेसाठी योगदान देऊ. इथेच मी माझे भाषण संपवते.     धन्यवाद! जय हिंद, जय भारत!

२६ जानेवारी लहान मुलांसाठी सोपी भाषण, सर्वजण करतील कौतुक ...

प्रजासत्ताकदिनाचा लहान मुलांसाठी धमाल भाषण  नमस्कार मित्रांनो, शिक्षकांनो आणि माझ्या प्रिय पालकांनो,  मी  आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे .   . आज इथे भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उभा आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. आज २६ जानेवारी आहे. हा दिवस भारतीय संविधान लागू झाल्याचा आणि भारत प्रजासत्ताक बनल्याचा दिवस आहे.  १९५० साली आपला संविधान लागू झालं आणि आपल्या देशाने खरं स्वातंत्र्य मिळवलं. आज १९७६ वे स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे . आपल्या संविधानाने प्रत्येकाला समान हक्क दिले आहेत. आपण धर्म, भाषा, प्रांत यावरून भेदभाव न करता एक देश, एक लोक म्हणून उभे आहोत. आपण लहान असलो तरीही आपल्याला देशाची सेवा करता येते. स्वच्छता राखणे, झाडे लावणे, इतरांचा आदर करणे—या लहान गोष्टीही देशासाठी महत्त्वाच्या आहेत. चला, आपण सर्वजण एकत्र येऊ आणि आपला देश अधिक सुंदर, प्रगतीशील आणि एकजूट करणारा बनवू. जय हिंद! जय भारत! अशीच माहिती हवी असेल तर आमच्या  website ला भेट द्या  

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व

इमेज
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपले संविधान (घटनेचे पुस्तक) अंमलात आणले आणि भारत हा पूर्णपणे लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक देश झाला. या दिवशी भारताला ब्रिटिश राजवटीपासून संपूर्ण स्वातंत्र्य मिळाल्याचे आणि स्वतंत्र संविधानाने मार्गदर्शन मिळाल्याचे प्रतीक आहे. 26-republic-day  प्रजासत्ताक दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी  १. पूर्ण स्वराज्याचा ठराव: २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा (पूर्ण स्वातंत्र्याचा) ठराव पारित केला. त्यामुळे २६ जानेवारीला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. २. संविधान अंमलात येणे: २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभा तयार केलेले भारतीय संविधान मंजूर झाले, परंतु २६ जानेवारी १९५० रोजी ते औपचारिकपणे लागू करण्यात आले. या दिवसापासून भारत प्रजासत्ताक राष्ट्र बनला.  प्रजासत्ताक दिनाचा उत्सव १. दिल्लीतील मुख्य समारंभ: दरवर्षी दिल्लीतील राजपथ (सध्या कर्तव्यपथ) येथे मुख्य प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमात राष्ट्रपती ध्...

Chess Game/ बुद्धिबळ खेळ/Chess या खेळाशी FIDE या शब्दाचा काय संबंध आहे ?

Chess Game / बुद्धिबळ खेळ   CHESS बुद्धिबळ हा इनडोअर खेळ आहे बुद्धिबळ हा 8x8 ग्रिडवर खेळला जाणारा दोन-खेळाडूंचा स्ट्रॅटेजी बोर्ड गेम आहे, जो चेसबोर्ड म्हणून ओळखला जातो. इसवी सन सहाव्या शतकात गुप्त साम्राज्याच्या काळात भारतात या खेळाचा उगम झाला आणि नंतर तो जगाच्या इतर भागात पसरला असे मानले जाते. त्यानंतर जगभरातील लाखो खेळाडूंनी त्याचा आनंद लुटून हा सर्वात लोकप्रिय गेम बनवला आहे. बुद्धिबळ हा सखोल रणनीतीचा खेळ आहे, ज्यामध्ये खेळाडूंना अनेक हालचालींचा विचार करावा लागतो, प्रतिस्पर्ध्याच्या चालींचा अंदाज घ्यावा लागतो आणि बोर्डावर नियंत्रण राखावे लागते. हे स्पर्धेच्या विविध स्तरांवर खेळले जाते, मित्रांमधील प्रासंगिक खेळांपासून ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंत, जेथे व्यावसायिक बुद्धिबळ खेळाडू त्यांचे कौशल्य प्रदर्शित करतात. खेळाची जटिलता आणि खोली यामुळे बुद्धिबळाच्या अनेक रणनीती आणि ओपनिंग सिस्टीम विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे ते सर्वांच्या उत्साही लोकांसाठी एक समृद्ध आणि आकर्षक बौद्धिक शोध बनले आहे. हा एक खेळ आहे ज्यामध्ये प्रभुत्व मिळविण्यासाठी सराव, अभ्यास आणि सर्जनशीलता आवश्यक आहे आणि त...

International yoga day 21st june

इमेज
     YOGA DAY ( योगा  दिवस )     योगा दिवस ( yoga day ) Wed 21 June 2023   yoga day यु नायटेड नॅशनल (UN) जनरल असेंब्लीच्या 69 व्या सत्रात भाषण देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिन ( yoga day ) साजरा करण्याचा प्रस्ताव दिला होता. 11 डिसेंबर 2014 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योग दिन प्रस्ताव 3 महिन्यांत बहुमताने स्वीकारण्यात आला.  21 june 2015 रोजी पहिला  (  First ) आंतरराष्ट्रीय योग दिवस ( yoga day ) साजरा करण्यात आला. 21 june 2015 रोजी योग दिनाची सुरुवात झाली, त्यानंतर जगभरात दरवर्षी 21 जून रोजी  आंतरराष्ट्रीय  योग दिवस ( International  yoga day ) साजरा केला जातो. International Yoga Day या दिवसाचा उद्देश आध्यात्मिक आणि शारीरिक साधनेच्या फायद्यांबद्दल जागरूकता पसरवणे आहे. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी योगा अत्यंत महत्वाचा आहे.  योगाचे महत्त्व हळू हळू वाढत आहे. भारतच नाही तर जगभरातील लोक निरोगी (Healthy) राहण्यासाठी योगाची मदत घेत आहेत....

vat Purnima information in Marathi 3 June 2023

इमेज
 वटपौर्णिमा - vat purnima information in marathi  यावर्षी ३ जून २०२३ या दिवशी वटपौर्णिमा हा सण साजरा करण्यात येत आहे. हिंदू  धर्मातील विवाहित स्त्रिया वटपौर्णिमा हा सण मोठ्या ऊसाहाने  साजरा करतात. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. वटपौर्णिमा  वटपौर्णिमा – पारंपरिक कथा     अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचे...

वेळेचा आदर केला पाहिजे / Time should be respected

इमेज
वेळेचा आदर केला पाहिजे /  Time should be respected काळ कोणासाठीही थांबत नाही. तो पुढे सरकतच राहणार आहे. काळाला कोणीही थांबू शकत नाही. आपल्याकडे किती पैसा, किती ताकद, किती मान आहे याला महत्व नाही. त्यासाठी वेळेचा आदर करायला हवा. गरीब असो किंवा श्रीमंत वेळ ही सर्वांना समान सारखीच आहे.  दिवसाचे २४ तास इतका वेळ सर्वांसाठी सारखाच मिळतो. तुम्ही हे २४ तास कसे घालवता यावरच बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत.  शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन रात्री १ तास डुलकी घ्यायचे. आयझेक न्युटन रात्री ३ ते ४ तास झोपायचे किंवा अनेक दिवस झोपेतच नसे. अलेक्झांडर ग्राहम बेल, दिवसभर काही काळ झोपायचे मात्र ते रात्री १० ते पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत काम करायचे.  म्हणजे जीवनात यशस्वी माणसांचा विचार केला तर ते वेळेला फार किंमत द्यायचे.  यावरून लक्षात येते. सर्वसाधारण व्यक्ती आपला वेळ कसा घालवायचा याचा विचार करत असतात, तर नेतृत्वक्षम व्यक्ती वेळ चांगल्या पद्धतीने वापरायचा यांचा विचार करत असतात.  आज जो तो इंटरनेटच्या मोहजालात अडकत चालला आहे. जिकडे तिकडे प्रत्येकाच्या हाती मोबाईलच दिसू लागले आहे. पु...

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

इमेज
त्र्यंबक बापूजी ठोंबरे मराठी साहित्य क्षेत्राला व्यापक इतिहास आहे. अनेक मराठी साहित्यीकांनी या क्षेत्रात दिलेले योगदान आजही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. जुन्या काळातील काही साहित्यीकांची साहित्य संपदा आजही मार्गदर्शक ठरणारी आहे. अशा अजोड साहित्यीकांमध्ये त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे एक आहेत  त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणून ओळखले जाते. मराठी साहित्यात आजही बालकवींचे स्थान अजोड आहे. गत काळावरही मात करीत बालकवींची कविता आजही तितकीच उत्कट प्रत्यय देणारी, रसिक मनाला भुरळ पाडणारी आहेत.   Balkavi ऑगस्ट १८९० साली धरणगाव येथे बालकवींचा जन्म झाला. बालकवींचे वडील बापूराव देवराव ठोंबरे आणि आई गोदाताई. बापूराव पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या वारंवार बदल्या होत. त्यामुळे बालकवींच्या शिक्षणात सतत खंड पडत गेला. मात्र त्या त्या गावातील निसर्गाने बालकवींना समृद्ध केले. ज्येष्ठ भगिनी जिजींच्या सहवासात पंडिती काव्याचे वाचन त्यांनी केले. जिजींमुळे बालकवींमध्ये कवितेची आवड निर्माण झाली. पुढे नाशिकला संस्कृत तर पुण्यात त्यांनी इंग्रजीचे अध्ययन केले. वडीलांच्या निधनानंतर बालक...
इमेज
                                              श्री राम नवमी  भगवान राम हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दैवत आहे. रामायण ग्रंथातील पुरुषोत्तम रूपात त्यांची महिमा वर्णन केली आहे. भगवान राम हा दशरथ राजे आणि कौशल्येच्या पुत्र होता. रामनवमी (shri ram navami) हा एक पवित्र प्रसंग आहे. जो भगवान विष्णूचा सातवा अवतार भगवान राम यांच्या जन्माचे स्मरण करतो, जे वाईटाचे निर्मूलन करण्यासाठी आणि धार्मिकता आणण्यासाठी मानवाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले. हा शुभ दिवस चैत्राच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो आणि या वर्षी तो ३० मार्च २०२३ रोजी येतो. राम नवमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा उत्सव आहे, जो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी रोजी साजरा केला जातो. या उत्सवाच्या दिवशी लोक रामचंद्राची जयंती साजरी करतात. हा उत्सव भारतातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. happy ram navami रामनवमी म्हणजे भगवान रामाच्या जन्मदिनाचा सण. या दिवशी हिंदू लोक रामाच्या मंदिर...

Gudipadwa

इमेज
                              HAPPY GUDI PADWA  गुढीपाडवा, गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालि वाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.  हिंदू धर्माचे नवीन वर्ष गुढीपाडव्यापासून (Gudipadwa ) सुरू होते. महाराष्ट्रात हा सण उत्साहात साजरा केला जातो. तथापि, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्यांमध्ये हा दिवस उगादी किंवा युगादी म्हणून साजरा केला जातो.विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा उत्साह पाहायला मिळतो.या दिवशी  नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. happy gudipadwa गुढी उभारताना लागणारे साहित्य : पूजा साहीत्य : - वेळुची काठी,उटणं, सुगंधीत तेल,हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, केशरी रंगाचे मोठे वस्त्र, कडुनिंबाचा पाला, चाफ्याच्या फुलांची माळ,साखरेचे कडे व माळ,तांब्याचा गडू,सुतळी, पा...

Holi rangpachmi 2023

इमेज
   होळी आणि सप्तरंगी रंगपंचमी आपले भारतीय संस्कृती विविध सणांनी समृद्ध आहे. प्रत्येक सणाचे महत्व वेगळे, थाट वेगळा! त्यातील अबालवृद्धांना आवडणारा सण म्हणजे होळी आणि त्यापाठोपाठ येणारी रंगपंचमी. होळी आणि रंगपंचमी म्हणजे दुधात साखर ! होळीच्या दिवशी सानथोर माणसे म्हणजे सर्व आधीपासूनच लाकूड फाटा जमवून ठेवतात. सायंकाळी गोवऱ्या आणि लाकडे पेटवून या होळीभोवती स्त्रिया फेर धरतात. मुले टीमकी वाजवतात. अग्नीच्या साक्षीने नावडत्यांच्या नावाने 'शिमगा' करतात, बोंबा मारतात. अपप्रवृत्त, दृष्टप्रवृत्तीचा नाश, त्याग करणे हा या सणांचा प्रमुख उद्देश आहे. होळी आणि पुरणपोळी समीकरण एक प्राचीन परंपरा आहे. रंगपंचमी आणि होळी  महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत होळी साजरी करण्याचा वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोकणातील होळी 'शिमगा' हा अगदी मोठ्ठा सण. पंचमीपासून रोज रात्री दहा दिवस 'होम' पेटवून त्या भोवती फिर धरून गाणी म्हटली जातात. पौर्णिमेच्या दिवशी मुख्य होळीचा होम. दहा दिवस देवांच्या पालख्या घरोघरी वाड्यांतून नाचवल्या जातात. त्या होळीच्या होमाभोवती नाचवल्या जातात. मथुरेत तर या सणाचे अन...

kalpna chawla

इमेज
          कल्पना चावला यांची जीवनपरिचय   कल्पना चावला ही हरियानाची   एक अवकाश - विरंगणा होती. कल्पना म्हणजे स्त्री शक्तीचा एक अविष्कारास असे म्हणावे लागेल. कल्पना चावला पहिली भारतीय महिला, की जिने अंतराळ झेप घेतले आणि एवढंच नाही; तर ती त्या अंतराळयानाची ची संचालक होती. हरियाणातील 'करनाल' नावाच्या एका छोट्याशा खेड्यात कल्पनाचा जन्म (१७ मार्च १९६२) साली झाला. तिच्या वडिलांचे नाव बनारसीलाल तिच्या वडिलांचे नाव आणि आईचे नाव संज्योती होते. कर्नालमध्येच तिने आपले प्राथमिक शिक्षण घेतले. शाळेत तिने नृत्याबरोबर कराटेचेही शिक्षण घेतले होते. सायकलवरून वेगात फिरणे तिला फार आवडे. kalpna chawla लहानपणापासून तिला अवकाशाचे अतिशय वेड होते. ती तासंन्तास ग्रह - ताऱ्यांकडे नजर लावून बसत असे. ती सतत उंच उंच जाण्याचा विचार करत राहायची. आपण एखादे अवकाशयान चालवत आहोत, अशी स्वप्ने ती कायम बघायची. ही स्वप्ने सत्यात येण्यासाठी तिने लहानपणापासूनच खूप कष्ट घेतले. चंदीगडच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एरोनॉटिक्स (विमान अभियांत्रिकी) हा विषय घेण्यारी ती एकम...

Happy international women's day

इमेज
  जागतिक महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. आपल्या भारतीय संस्कृती मध्ये स्त्रियांना फार महत्व आहे.त्यांचे विशेष सन्मान आणि कौतुक केले जाते.आपल्याकडे महिलेला देवीचे रूप मानले जाते. पुराणातील श्लोक मध्ये देखील स्त्रियांचा महत्वपूर्ण उल्लेख केला गेला आहे.जसे की “यस्य पूज्यंते नार्यस्तु तत्र रमन्ते देवता” या ओळींचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी नारीचे पूजन केले जाते,त्या ठिकाणी भगवंत निवास करतात. happy womens day 1900 च्या दशकाच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जात आहे.  ऑगस्ट 1910 मध्ये, डेन्मार्कमधील कोपनहेगन येथे सोशलिस्ट सेकंड इंटरनॅशनलच्या ( International Socialist Women's)  सर्वसाधारण सभेच्या आधी आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकन समाजवाद्यांपासून प्रेरित होऊन, जर्मन प्रतिनिधी क्लारा झेटकिन, केट डंकर आणि इतरांनी वार्षिक ‘महिला दिन’ (women's day)  स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला.   संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन  (women's day)   साजरा केल...